Secondary Marathi Rajbhasha Diwas (2022-2023)
दिनांक : २८ फेब्रुवारी २०२३, सरस्वती विद्यालय हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,
राबोडी, ठाणे येथे दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कवी, लेखक,
साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री. वि.वा. शिरवाडकर
( कुसुमाग्रज ) यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा
दिन म्हणून घोषित करण्यात आला.
मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.शाळेचा
मुख्याध्यापिका सौ.अनिता पिंटो मॅडम, समन्वयक सौ. मिनाक्षी बंगेरा मॅडम, व श्री बलराम
दास सर यांचा उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमात काव्य वाचन, काव्य गायन, नृत्य
सादरीकरण असे विविध उपक्रम घेण्यात आले . विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन
कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला.
शाळेतील मराठी विभागातील अनुभवी शिक्षिका सौ. रेखा नलावडे यांनी मराठी राजभाषा
दिनाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांचे योग्य मार्गदर्शन केले
तसेच, त्यांचा मनात मराठी भाषेविषयी प्रेम व आपुलकी निर्माण व्हावे असा मराठी राजभाषा
दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश्य होता.