Primary Marathi Bhasha Din 2023


मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचा गौरव आणि मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यान पर्यंत पोहचवण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आपल्या सरस्वती विद्यालय मध्ये २७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी मराठी भाषा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला गेला.

आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याधापिका सौ. अनिता पिंटो, समन्वयिका सौ. मिनाक्षी बंगेरा व मराठी शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शना खाली व प्रोत्साहना सहित मराठी भाषा दिवस कार्यक्रमा मध्ये ‘मराठी साहित्य दिंडी’ आयोजित केली होती. त्याचप्रमाणे काव्य वाचन, मराठी लोकगीते जसे कि भारुड, गोंधळ आणि विज्ञान गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी पारंपारिक मराठी वेशभूषा करत अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.

या कार्यक्रमाद्वारे आपल्या आदरणीय मुख्याध्यापिका यांनी मुलांशी संवाद साधून मराठी भाषेचे महत्व व शुद्ध भाषा आत्मसात करण्याचे महत्व मुलांना समजावत विद्यार्थांना जास्तीत जास्त भाषा

शिकण्यासाठी प्रोत्साहित केले व त्यांच्या कार्यक्रमातील सहभागाबद्दल कौतुक करून मुलांचा उत्साह वाढवला.


Updated on - March 2023