Sangeet Megh Malhar

सरस्वती विद्यालय प्रस्तुत संगीत मेघ मल्हार प्राथमिक विभागाच्या छोट्या कलाकारांचा छानसा बहारदार कार्यक्रम दिनांक २०-७-२०२४ रोजी शनिवारी संपन्न झाला. आमच्या शाळेच्या C.E.O मॅडम कोरडे वेळात वेळ काढून छोट्या कलाकारांचे कौतुक करावयास उपस्थित होत्या. ह्या कार्यक्रमाची संकल्पना त्यांचीच. तिला मूर्त रूप दिले ते आमच्या शाळेच्या प्रशासिका मॅडम मंजुषा बल्लाळ ह्यांनी.आमच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका मॅडम अनिता पिंटो. ह्या मुलांच्या मेहनतीला दाद द्यायला आवर्जून उपस्थित होत्या. नेहमीच हसतमुख आणि सर्वांना आपल्याश्या वाटणाऱ्या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम पूनम भोगले, ह्यांच्या प्रोत्साहनाने संगीत मेघ मल्हार हा वर्षासरींचा कार्यक्रम सगळ्यांच्या मनात पावसाची गाणी पेरत संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या शाळेच्या सर्व व्यवस्थापकांनी मोलाचे सहकार्य केले.






Contact Us

S A R A S W A T I

Loading