ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा होणारा 'मराठी भाषा गौरव दिन" सरस्वती विद्यालय, राबोडी, ठाणे येथे मराठमोळ्या वातावरणात पार पडला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणून या वर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला.
'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कथाकथन सादर झाले. विद्यार्थ्यांनी मराठीतील दिग्गज कवींच्या कवितांचे वाचन केले. मराठी विभाग प्रमुख श्रीमती संध्या देशमुख यांनी 'मराठी विषयातील साहित्यप्रकार' या संबधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूनम भोगले यांनी मराठी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शाळेच्या प्रशासक सौ मंजुषा बल्लाळ यांनी 'मराठी भाषा संवर्धन' याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेचे समन्वयक सौ. राखी खन्ना, श्री. कपिल कुळकर्णी तसेच शाळेचे कार्यालयीन प्रमुख श्री. विनायक शिंदे उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Loading